टेलीग्रामने लाँच केले आहे एक जबरदस्त फीचर ! जाणून घ्या सविस्तर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली -
सुरक्षा आणि फीचर्सच्या बाबतीत टेलिग्राम नेहमीच चर्चेत असतो. टेलिग्राम थेट मेटा (फेसबुक) च्या मालकीच्या व्हॉट्सऍप ऍपबरोबर स्पर्धा करते. दोन्ही ऍप्समध्ये दर महिन्याला अनेक नवनवीन फीचर्स येत राहतात. आता टेलिग्रामने मेसेजचे भाषांतर, मेसेजवरील इमोजी रिऍक्शन इत्यादीसह अनेक फीचर्स एकत्र आणली आहेत. चला जाणून घेऊया टेलीग्रामच्या काही नवीन फीचर्सबद्दल...
० टेलिग्रामचे वापरकर्ते आयफोनच्या मेसेंजरप्रमाणेच इमोजीद्वारे संदेशावर प्रतिक्रिया देऊ शकतील. हे फिचर क्विक रिस्पॉन्सचाच एक भाग आहे. मेसेजवर प्रतिक्रिया देण्याची सुविधा इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरमध्ये आधीपासूनच आहे. व्हॉट्सऍप देखील या फीचरची चाचणी करत असल्याची माहिती आहे. तुम्ही सेटिंग्ज > क्विक रिऍक्शनवर जाऊन ते सेट करू शकता.
० याशिवाय टेलिग्राममध्ये क्यूआर कोडचा पर्यायही आला आहे म्हणजेच आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलचा किंवा ग्रुपच्या प्रोफाइल फोटोचा क्यूआर कोड तयार करून तो कोणाशीही शेअर करू शकता.
० टेलिग्राममध्ये एक मोठे फिचर इन-ऍप भाषांतर आले आहे. हे फिचर कोणत्याही संदेशाचे तुमच्या भाषेत भाषांतर करू शकते. तुम्ही Settings>Language वर जाऊन ते सक्रिय करू शकता. तुम्हाला भाषांतरासाठी अनेक भाषा पर्याय मिळतील. सध्या हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी आले आहे, लवकरच ते iOS साठी देखील जारी केले जाईल.
० टेलिग्रामने स्पॉयलर फॉरमॅटिंग नावाचे आणखी एक फिचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स मेसेजचा काही भाग लपवू शकतील. जर एखाद्याला पूर्ण संदेश पाहायचा असेल तर त्याला खाली दिलेल्या पर्यायावर टॅप करावे लागेल.