केएल राहुलकडे मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत असेल संघाचा उपकर्णधार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली -
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून येथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी केएल राहुलला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याला दुजोरा देत वृत्तसंस्था एएनआयने संघाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, रोहितच्या अनुपस्थितीत राहुल संघाचा उपकर्णधार असेल.
भारतीय बोर्डाने यापूर्वी अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार बनवले होते, परंतु या आठवड्यात सोमवारी बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीबद्दल आणि मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली. रोहितच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचाळचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचे वेळापत्रक
सामन्याची तारीख मैदान
पहिली कसोटी २६-३१ डिसेंबर २०२१ सेंच्युरियन
दुसरी कसोटी ०३-०७ जानेवारी २०२२ जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी ११-१५ जानेवारी २०२२ केप टाऊन
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत, मोहम्मद शर्मा, शमी, शर्मा. उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय खेळाडू:
नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागवासवाला.