अडीच लाखांसाठी पोटच्या मुलीला विकणाऱ्या आईसह पाचजणांना अटक 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अडीच लाखांसाठी पोटच्या मुलीला विकणाऱ्या आईसह पाचजणांना अटक 

नवी मुंबई -

अडीच लाख रुपयांसाठी पोटच्या पोरीचा सौदा करणाऱ्या जन्मदात्रीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील उलवे परिसरात खळबळ उडून देणारा हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लालची आईसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. नवी मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्याच 10 दिवसांच्या मुलीला अडीच लाखांना विकणार असल्याचे पोलिसांना समजले होते. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले.

या लोकांकडे चौकशी केली असता रितसर दत्तक घेण्याची कोणतीही प्रक्रिया आढळली नसल्याने नवजात बालकांची अनधिकृरीत्या विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या आईसह आरोपींना अटक केली. आरोपीकडून चार मोबाईल, पॅनकार्ड आणि पन्नास हजार रुपयाचे पाच बंडल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बालक आणि आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी सांगितले.