त्याग व बलिदानाची बकरी ईद (ईद-उल-अजहा) पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
चिंचवड , (प्रबोधन न्यूज ) - मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या त्याग बलिदानाचे स्मरण या ईद निमित्त मुस्लीम बांधव सर्वत्र करतात. पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची नमाज सकाळी ७ ते ९ दरम्यान विविध मशिदीत, मदरचा ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला.
पिंपरी चिंचवड शहरात निगडी, चिंचवड, आकुर्डी,
चिंचवड परिसरात चिंचवडगाव-आलमगीर शाही मशीद, मौल्लाना मिनहाज असरफी, मौल्लाना इनामुल हक, चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार-हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफिज वसीम साहब, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन साहब, आकुर्डी-मजीद ए मदिना-मुफ्ती अबीद साहब, आकुर्डी-मजीद ए अक्सा-मुफ्ती अब्दुल कादीर साहब, काळभोरनगर-मजीद ए फारूकीया-हाफीज लायक साहब, बिजलीनगर-मजीद ए नूरईलाई-मौल्लाना अब्दुल सकूर साहब, वाल्हेकरवाडी-मजीद ए बीसाल-मौल्लाना खुर्शीद साहब, चिंचवडेनगर-मजीद ए हुसैनी-मौल्लाना आखीब साहब, दळवीनगर-मजीद ए बीसाल-हाफीज जैन्नूद्दीन साहब, चिंचवडगाव-मजीद ए ईदगाह-मौल्लाना मिनाज साहब यांनी नमाज पढविला.
आज सकाळी मुस्लिम बांधव नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा परिधान करून सुवासिक अत्तर व तेल लावून बकरी ईदची नमाज पठण केले. त्यानंतर ईदगाह मैदानात असलेल्या कबरीवर मुस्लीम बांधवानी कुटुंबातील मयत झालेल्या आपल्या पूर्वजांच्या कबरीजवळ पुष्प ठेवून त्यांचे स्मरण केले.
विविध ठिकाणी नमाज पठण सामुहीकरित्या पार पडल्या, त्यावेळी धर्मगुरु मुफ्ती, मौल्लाना, हाफिज साहब यांनी अल्लाहाची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा, बकरी ईद निमित्त सर्वांचा आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण आहे. ईदच्या नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोणाचाही द्वेष करू नका, एकात्मता व बंधुत्वाची कास अंगीकारून एकत्रित आपली दिनचर्या पार पाडा. तसेच, अनेकांनी मोबाईलद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या, सर्वठिकाणी ईद साजरी करण्यासाठी विविध मशीदीचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले. पोलीसांनी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यांचे आभार मानण्यात आले.