लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर

    नवी दिल्ली ,  (प्रबोधन न्यूज )  -      संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केल्या आहेत. आज, शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. कोणत्या जिल्ह्यात कधी मतदान होणार आहे. तसेच मतदानाची तारीख आहे. हे निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. ही १८ लोकसभा निवडणूक असणार आहे. ९७ कोटी मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. ही लोकसभा निवडणूक सर्वांत मोठी निवडणूक सांगण्यात येत आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक घेणं हे आव्हान. दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरु होती. मी स्वत: ८० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. देशात साडेदहा लाखाहून अधित मतदान केंद्र आहेत. ११ राज्यातल्या निवडणुका आतापर्यंत शांततेत पार पडल्या आहेत. आमच्यावरच्या कोर्ट केसेस देखील कमी झाल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करत आहोत. यंदा १ कोटी ८२ लाख नवीन मतदार असणार आहेत. ५५ लाख एव्हीएम मशीन असणार आहेत आणि १ कोटी ५ लाख निवडणूक अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षक असणार आहेत. या निवडणुकीचा निकाल १३मेला जाहीर होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.