ऑटो टॅक्सी बस ट्रक टेम्पो चालक मालकांचे दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन
केंद्र सरकारच्या भांडवल धार्जिण्या धोरणा विरोधात देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार, कष्टकरी जनता त्रस्त आहेत. जनतेच्या मनामध्ये रागआहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरूच राहणार : बाबा कांबळे
सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा बाबा कांबळेंचा आरोप
नवी दिल्ली - 6 मार्च 2023 रोजी दिल्लीत ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे! फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंदोलनामध्ये देशातील सर्व राज्यातून पाठिंबा मिळत आहे. ऑटो टॅक्सी बस ट्रक चालक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार केला आहे! हे आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आंदोलनातून भाजपप्रणीत संघटना अलिप्त आहे. पण तरीही हा लढा सुरूच राहील, असे बाबा कांबळे म्हणाले!
आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक करून तुरुंगात टाकले तरी आम्ही मागे हटणार नाही! भारतातील 25 कोटी चालक-मालक आपल्या हक्कासाठी मैदानात उतरले आहेत. देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार मजूर ऑटो टॅक्सी बस ट्रक चालक सरकारच्या गरीब विरोधी धोरणांमुळे त्रस्त आहेत, पण केंद्र आणि राज्य सरकार लक्ष देत नाही! त्यामुळे सर्वांच्या मनात सरकारविरोधात रोष आहे. ज्याप्रमाणे देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध केला. त्याच पद्धतीने देशभरातील ऑटो टॅक्सी बस टेम्पो चालक-मालक प्रतिनिधी सरकारचा निषेध करत आहेत! याची सरकारला धास्ती आहे.
सरकारकडून आंदोलकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपप्रणित संघटना आधी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत होत्या पण भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या सूचनेमुळे ही संघटना धरणे आंदोलनात भाग घेत नाही. पण तरीही आपण सर्वजण एकजुटीने आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या जाहीर करत आहोत.
तेलंगणा येथील फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बी विनय भूषणजी म्हणाले की, सरकारच्या या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व एकजुटीने लढा देऊ देशातील श्रमिक कष्टकरी ड्रायव्हर हितासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
राजस्थान येथील राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सूरज नाईकजी म्हणाले की, ऑटो टॅक्सी बस आणि ट्रक चालकांसह देशातील सर्व चालक प्रचंड नाराज आहेत. त्यांच्याकडे कोणतीही सुविधा नाही, शिवाय भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलीस हप्ता वसुली करीत आहेत. वाहतूक विभागही विनाकारण दंड आकारत आहेत. यामुळे चालक-मालक नाराज आहेत.
पंजाब बॉर्डर येथील फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष के.डी.गिल यांनी म्हटले आहे की, सरकार बाबा कांबळेंना घाबरते आहे. 2013 मध्ये महाराष्ट्रातील अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात दिल्लीत प्रचंड आंदोलन केले होते. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चामुळे यानिमित्त दिल्लीत अण्णांच्या आंदोलनाची बरीच चर्चा आहे. पन्नास कोटी ऑटो टॅक्सी बस व श्रमिक कष्टकऱ्यांचे बाबा कांबळे नेतृत्व करत आहेत, सरकार बाबांना घाबरत आहे, म्हणून ते आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात आंदोलन सुरूच राहणार आहे. बाबाजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाऊ,
दिल्ली येथील अडवोकेट चिरंजीत म्हणाले दिल्लीमध्ये आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून, दिल्लीतील सर्व पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होतील. बाबा कांबळे यांचे नेतृत्व देशभर मान्य होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये पुढे घेऊन जाऊ.