परतीच्या पावसाची तारीख 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

परतीच्या पावसाची तारीख 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान

    पुणे , (प्रबोधन न्यूज )  -   यंदा समाधानकारक पाऊस नसताना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्चित झाला आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्व राजस्थानमधून सुरु होणार आहे. 17 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रवास उशिराने म्हणजे 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होईल. लंडनमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे जिल्ह्याची पावसाची सरासरी 766.7 मिलिमीटर आहे. परंतु यंदा आतापर्यंत केवळ 66.3 टक्के पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा झाला असला अजून दमदार पाऊस झालेला नाही.

राज्यात यंदा मान्सून रुसला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला झाला नाही. ऑगस्ट महिन्यात दीर्घ सुटी पावसाने घेतली आहे. राज्यात सर्वत्र यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. पुणे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ 443.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन महिन्यात पाऊस सरासरीच्या 66.3 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 322.8 मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. आता परतीच्या पावसाची तारीख झाली आहे.