महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक

पिंपरी ( प्रबोधन न्यूज )  - महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या '९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४' मध्ये खराळवाडी स्पोर्ट्स क्लबच्या निश्चय सुभाष जिनवाल ने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. निश्चय हा पिंपरी येथील खराळवाडी परिसरातील रहिवासी आहे. 

पिंपरी चिंचवड संघाचे प्रतिनिधित्व करत निश्चय जिनवाल (वय -१४) याने सब ज्युनिअर ६४ ते ६७  वजनी गटात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे.याने जिद्द, चिकाटी,एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचे वडील सुभाष जिनवाल हेच त्याचे प्रशिक्षक आहेत. तो खराळवाडी येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्हा अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन ऑफ नागपूर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रवी नगरातील विद्यापीठ मैदानाजवळील सुभेदार सभागृहात २२ ते २६ जुलै दरम्यान करण्यात आले होते. नागपूर ,गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, ठाणे, मुंबई, पुणे  अशा एकूनच ३३ मुलांचा व ३३ मुलींचा जिल्हा व शहर संघ सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून ४५६ खेळाडू सहभागी झाले होते.

त्याने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कडवी झुंज देत अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदक पटकाविले. निश्चयने पिंपरी चिंचवड शहराचे नाव लौकीक केले आहे.यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.