पत्नीचा जामीन करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून एकाने केला वृद्ध महिलेचा खून

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पत्नीचा जामीन करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून एकाने केला वृद्ध महिलेचा खून

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   पोलिसांनी पत्नीला एका गुन्ह्यात अटक केली. तिचा जामीन करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेला लुटून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी येथे 31 जुलै रोजी उघडकीस आला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, 31 जुलै रोजी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास डायल 112 वर गुणाजी यशवंत रोकडे (वय 75) यांनी कॉल केला. सेनेट्री चाळ भाजी मंडई जवळ पिंपरी येथे त्यांच्या सासू शालूबाई रूपा साळवी (वय 85, रा. सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी) या मृतावस्थेत पडल्या आहेत. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या शालुबाई यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

याप्रकरणी 5 ऑगस्ट रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत शालुबाई या पिंपरी येथे एकट्याच राहत होत्या. अज्ञाताने घराच्या छताचा सिमेंटचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत शालुबाई यांना ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील व घरात असलेले सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, गॅस सिलेंडर असा एकूण एक लाख चार हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे फिर्यादीत नमूद होते.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलिसांनी दोन पथके तैनात केली. या पथकातील पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा ही घटना घडल्यापासून त्या भागात दिसत नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलावर लक्ष केंद्रित केले. सात ऑगस्ट रोजी सदर अल्पवयीन मुलगा पिंपरी भाजी मंडईच्या आवारात लपून छपून फिरत होता. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला. आपल्या मागावर पोलीस आहेत हे लक्षात येताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यात त्याने धक्कादायक माहिती दिली.

म्हणून केला खून 

त्याने हा गुन्हा केला असून त्याची पत्नी जेलमध्ये आहे. तिचा जामीन करण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. शालूबाई यांना ठार मारून त्यांच्या अंगावरील दागिने चोरून त्यातून पैसे मिळवण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, गॅस सिलेंडर असा 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

असा केला खून 

घराला लागून असलेल्या बाथरूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या ड्रमवर उतरून त्याने छतावरून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने शालूबाई यांचा गळा दाबून आणि त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने शालूबाई यांच्या अंगावरील दागिने, घरातील दागिने, रोख रक्कम, साळवे यांचा एक मोबाईत घेऊन निघून गेला. शालूबाई यांनी घराच्या लोखंडी दाराला एक कुलुप लावले होते. हे कुलूप तोडून त्याने तोडले आणि पसार झाला. शालूबाई यांच्या पतीचे यापूर्वी निधन झाले आहे. साळवे दाम्पत्य पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला होते. साळवे या 1999-2000 साली निवृत्त झाल्या आहेत. त्यानंतर त्या सॅनिटरी चाळ येथे एकट्याच राहत होत्या. तर त्यांची मुलगी-जावई आणि अन्य कुटुंब शहरात विविध भागात राहतात.