याला म्हणतात शिक्षणाचा पुरेपूर वापर; गाड्या चोरल्या अन् सगळे पार्ट खोलून भंगारात विकले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - हिंजवडी येथील एका तरुणाने गाड्यांची आवड म्हणून त्याने ऑटोमोबाईल शाखेतून डिप्लोमा केला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या दुचाकी गाड्या चोरण्यास सुरुवात केली. एका गाडीचे पार्ट दुसऱ्या गाडीला लावायचे, नंबर प्लेट बदलायची, रंग बदलायचा आणि गाडी वापरायची. तर काही गाड्यांचे स्पेअर पार्ट काढून ते भंगारात विकायचे. पण हा प्रकार फार दिवस चालला नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास येताच गाड्या चोरणारा तरुण, त्याचा साथीदार आणि भंगार व्यावसायिक यांना पोलिसांनी पकडले.
अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे (वय 26, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) असे वाहन चोरी करणाऱ्या सराईताचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भंगार व्यावसायिक समशेर इस्माईल सहा (वय 28, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) यालाही चोरीचा माल विकत घेतल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे यांनी याबाबत माहिती दिली, आरोपी अक्षय याला यामाहा आर एक्स 100 या दुचाकीचे आकर्षण होते. त्यामुळे तो सांगवी, चिंचवड, चिखली, वाकड, पिंपरी, हिंजवडी, दिघी परिसरातून वाहन चोरी करू लागला. चोरलेल्या गाड्यांचे पार्ट बदलून त्या वापरत असे. ओळखता येऊ नये यासाठी तो रंग आणि नंबर प्लेट देखील बदलत असे. चोरलेल्या गाड्या तो त्याच्या शेतातील गोठ्यात लपवून ठेवत असे. तसेच त्याने काही गाड्यांचे पार्ट काढून भंगार व्यावसायिक समशेर याला विकले.
पोलिसांनी सुरुवातीला अक्षय याला अटक केली. त्यानंतर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांनी काही गाड्यांचे पार्ट भंगारात विकले असल्याचे निष्पन्न झाल्याने समशेर यालाही अटक करून तिघांकडून एक कार, 13 दुचाकी, दोन दुचाकीचे इंजिन आणि इतर पार्ट असा एकूण 11 लाख 80 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अक्षय याने एक दुचाकी त्याच्या मैत्रिणीला वापरण्यासाठी दिली होती. ती दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. चोरीची दुचाकी असल्याची तिला कल्पना होती किंवा नव्हती याची पोलीस चौकशी करीत आहेत. ती वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याची तिला माहिती असल्यास तिला देखील सह आरोपी केले जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सांगितले.