स्मार्ट कार्ड लायसन्स व आरसी बुक स्मार्ट कार्ड छपाई केंद्र पुण्यात करण्यात यावे - मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - स्मार्ट कार्ड लायसन्स व आरसी बुक स्मार्ट कार्ड छपाई केंद्र पुण्यात करण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत जेजुरी येथे निवेदन देताना राजू घाटोळे यांनी केली .
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत जेजुरी येथे आरटीओ पुणे हे कार्यालयात देशात एक नंबर व या कार्यालयाच्या मार्फत दर महिन्याला 32000 ड्रायव्हिंग लायसन्स देणारे कार्यालय आहे.
एका महिन्यात वीस हजार पेक्षा नवीन वाहनांची नोंदणी या कार्यालयात होते. महसुलामध्ये राज्यात आरटीओ पुणे कार्यालयाचा राज्यात एक नंबर आहे तसेच देशातील एक नंबर असलेल्या कार्यालयात वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड छपाई केंद्र पुणे येथे होणे आवश्यक आहे या संदर्भात आज नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या मान्यवरांना आज जेजुरी येथे शासन आपल्या दारी या योजनेचे अंतर्गत प्रत्यक्ष भेट देऊन आरटीओ पुणे येथे वाहन परवाना वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड छपाई केंद्र सुरू करावे अशी मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने करण्यात आली .
प्रसंगी राज्य अध्यक्ष राजू घाटोळे, महिला विभागाच्या अर्चना इरकल , राष्ट्रवादी औद्योगिक विभागाचे अध्यक्ष संतोष कपटकर, राज्याचे खजिनदार एडवोकेट निलेश गांगुर्डे, सुरेश देवकर, आदी उपस्थित होते. यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालय उपमुख्यमंत्री कार्यालय शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुप्रिया सुळे , कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या मान्यवरांना ईमेलद्वारे वरील वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड छपाई केंद्र पुण्यात करण्यात यावे यासाठी मागणी केली. तसेच या मागणीसाठी आमदार रवींद्र धंगेकर व माजी आमदार मोहन जोशी यांनी असोसिएशनच्या वतीने असेंबली क्वेश्चन विधिमंडळ अधिवेशनामध्ये उपस्थित केला आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक चालक संघटना यांचे वतीने पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात नागरिकांच्या सह्या आंदोलन सुरू केले आहे . महाराष्ट्र मालक चालक संघटना यांच्या वतीने शितल कोठारी बारामती या जेजुरी येथे शासन आपल्या दारी अंतर्गत वरील प्रश्न उपस्थित करण्यासाठी उपस्थित होत्या. तसेच वरील सही मोहीम राबवण्यासाठी महेश शेळीमकर, एकनाथ ढोले, कृष्णा दाभाडे , विठ्ठल मेहता यांनी विशेष प्रयत्न केले.