केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नेत्यांना 'नोटीस अन् नजरकैद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नेत्यांना 'नोटीस अन् नजरकैद

पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. तर, आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांना सकाळी दहा वाजल्यापासून सांगवी पोलीस स्टेशन येथे काळे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे व प्रकाश घोडके यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकार बहुराज्यीय सहकारी संस्थांना (मल्टीस्टेट) त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी डिजिटलवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्राने विकसित केलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्था पोर्टल एकात्मिक पोर्टलचे उद्‌घाटन सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथे होणार आहे.
पोलिसांनी खबरदारी म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना नोटिसा दिल्या आहेत. तर, भापकर यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. भापकर नजरकैदेत आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवणे, पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारचे निवेदन देणार नाहीत. काळे झेंडे दाखविणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कायम सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोटीसीचा भंग होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे नोटिशीत म्हटले आहे.