पंतप्रधान मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंतप्रधान मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट

व्हॅटिकन सिटी - 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पोप फ्रान्सिस यांची येथे भेट घेऊन कोरोना महामारी, जागतिक शांतता या मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. पोप फ्रान्सिस यांना आपण भारत भेटीचे निमंत्रण दिले असून, त्यांच्यासोबतची चर्चा यशस्वी ठरल्याची माहिती मोदी यांनी दिली. फ्रान्सिस 2013 मध्ये पोप झाल्यानंतर त्यांची भेट घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या घेतलेल्या भेटीचे छायाचित्र ट्विटरवर सामायिक करण्यात आले आहे.

पोप फ्रान्सिस यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी व्हॅटिकन येथील अ‍ॅपोस्टोलिक पॅलेस येथे झालेल्या भेटीनंतर केले. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 मध्ये त्यांनी व्हॅटिकन सिटीला भेट देऊन तत्कालीन पोप जॉन पॉल-2 यांच्यासोबत चर्चा केली होती. आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना पोप यांना भारत भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीची वेळ केवळ 20 मिनिटे ठरली असताना त्यांच्यात तासभर चर्चा झाली. वातावरण बदलासोबत लढा देणे आणि गरिबी दूर करणे यासह विविध मुद्यांवर त्यांच्यात चर्चा झाली, असे सूत्राने सांगितले. पोप फ‘ान्सिस यांनी व्हॅटिकन अ‍ॅपोस्टोलिक पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, अशी माहिती व्हॅटिकन सिटीने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. व्हॅटिकन सिटी आणि भारतातील सौहार्दपूर्ण संबंधांवर त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.