सार्थक जाधवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सार्थक जाधवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 
पिंपरी,  (प्रबोधन न्यूज ) -  रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूलच्या दहावी इयत्तेतील विद्यार्थी सार्थक जाधवची सीबीएसई राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षाखालील वयोगटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
   "सीबीएसई क्लस्टर 9" या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा सार्थक जाधव याने २००, ४०० मीटर सह ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आणि ६ नोव्हेंबर रोजी छत्तीसगड, रायपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी क्रीडा शिक्षक धनाजी पाटील व गौरी उत्तारे यांचे मार्गदर्शन सार्थक ला मिळाले. पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी जाधव याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सार्थक जाधव चे अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.