संभाजी भिडे गुरूजी यांनी केली ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’च्या जागेची पाहणी - आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रालाही संभाजी महाराजांचे नाव?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शिव-शंभू प्रेमींच्या पुढाकाराने मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत जगातील सर्वांत उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ उभारण्यात येत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी या जागेची पाहणी केली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ चे काम हाती घेण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा तब्बल १४० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम दिल्ली येथील कार्यशाळेत सुरू आहे.
यापूर्वी, ज्या जागेत हा पुतळा उभारण्यात येत होता. ती जागा दोन इमारतींच्या मध्ये असल्यामुळे अपुरी होती. त्यामुळे प्रशस्त जागेत पुतळा आणि शंभू सृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरली होती. त्याला यश मिळाले आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील अडीच एकर जागा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले. जागेचे महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरणही करण्यात आले आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी प्रस्तावित शंभूसृष्टीच्या जागेची पाहणी करण्याची इच्छा पिंपरी-चिंचवडमध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने आले असता केली होती. यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, माजी स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, संतोष लांडगे, अमित जावळे, गणेश भुजबळ, सतिश लांडगे, मोशीतील ग्रामस्थ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा मोशी येथे साकारत आहे, ही आम्हा पिंपरी-चिंचवडकर आणि शिव-शंभूप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. शूभराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची जाज्ज्वल्य यशोगाथा भावी पिढ्यांना समजावी आणि शिव-शंभू. विचार घराघरांमध्ये रुजावा, या करिता हा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदूभूषण’ उभारला जात आहे. नवीन जागेत उभारण्यात येणाऱ्या या प्रेरणास्थळाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक गुरूवर्य श्री. भिडे गुरूजी यांनी भेट दिली. ‘‘आपल्या राजाच्या कार्याची भव्यता जशी होती, तसेच भव्य शंभूसृष्टी या ठिकाणी उभारली जात आहे...’’ अशी कौतुकाची थाप गुरूजींनी दिली. त्यामुळे हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.