पूर्वीचे सरकार घरी बसून निर्णय, आमचं सरकार नागरिकांना लाभ देण्यासाठी त्यांच्या दारी येतेय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - पूर्वीचे सरकार घरी बसून निर्णय घेत होते. आमचं सरकार नागरिकांना लाभ देण्यासाठी त्यांच्या दारी आलं आहे. कोरोनाचे सर्व प्रतिबंध आम्ही उठवले. त्यामुळे कोरोना पळून गेला आहे. आमचं सरकार खोटं काम करत नाही. आम्ही घरात बसून आदेश देत नाही. प्रत्यक्ष बघतो, लोकांमध्ये फिरतोय. ‘शासन आपल्या दारी’ घेऊन आलोय. त्यामुळे ‘हे असंच चालू राहिलं तर, आपलं काही खरं नाही,’ अशी विरोधकांना भीती आहे.’’ असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगाविला.
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत सरकारच्या व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध योजनांच्या लाभार्थींना विविध दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. थेरगावमध्ये झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे आदी उपस्थित होते.
जाहिरातींमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही एकदम मजबूत आहोत. ही युती एका विचाराने निर्माण झाली आहे. ती एखाद्या जाहिरातीने तुटेल इतकी ही कच्ची युती नाही. एकाने सर्वेक्षण केलंय त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला पसंती मिळतीये. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 80 टक्केपेक्षा जास्तीची पसंती मिळाली.
आम्ही जी आश्वासनं देतो, ती सगळी अश्वासनं पूर्ण करतो, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे, जगामध्ये माझ्यासारखा मुख्यमंत्री पाहिलाय का?,असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला विचारला आहे. ते म्हणाले की, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठंही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलंय का?, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आतापर्यंत बघा, आम्ही सगळं पूर्ण करतोय. हे सरकार खोटं नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यासोबतच इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण केलं जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पिंपरी-चिंचवडमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. य़ा कार्यक्रमात ते बोलत होते.