ब्रेकिंग न्यूज – गहलोत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ब्रेकिंग न्यूज – गहलोत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - काँग्रेसच्या गोटातून आलेल्या मोठ्या बातमीनुसार, अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदातून माघार घेत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत सुरू असलेली बैठक आता संपली आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर आता अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचे काही पत्रकारांना सांगितले आहे.

आज बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी कोची येथे राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिल्यावर मी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले पण आता त्या घटनेनंतर (राजस्थानातील राजकीय संकट) मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांसोबतच्या बैठकीत ते म्हणाले की, “मी नेहमीच एक निष्ठावान सैनिक म्हणून काम केले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. या घटनेवरून असा गैरसमज झाला की मला मुख्यमंत्रीपदावरच राहायचे आहे. त्याबद्दल मी स्पष्टीकरण दिले आहे सोबतच माफीही मागितली आहे. यासोबतच गेहलोत म्हणाले, "आम्ही हायकमांडला एका ओळीचा प्रस्ताव पाठवण्याची इथली प्रथा नेहमीच राहिली आहे. मुख्यमंत्री असतानाही हा एक ओळीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही, याचे मला दुःख आहे. त्यामुळे देशभर चर्चेला विनाकारण कारण मिळाले.

विशेष म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला आणि ते म्हणाले की ते कदाचित शुक्रवारी अर्ज दाखल करतील. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर सिंह म्हणाले, मी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलो आहे. मी कदाचित उद्या ते भरेन."

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर कार्यक्रमानुसार २२ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.