दुहेरी आत्महत्येच्या तपासाबाबत प्रश्नच

या मुलीच्या मृत्यूबरोबरच तिच्या प्रियकरानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे. म्हणजे एका अर्थाने दुहेरी हत्याकांड आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दुहेरी आत्महत्येच्या तपासाबाबत प्रश्नच

पिंपरी – खराळवाडीतील संशयास्पद मृत्यू पावलेल्या मुलीच्या आईने मृत्यूनंतर तीन दिवसांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराच्या कारणातच या गुन्ह्याचे मूळ दडले असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

एका साडेसतरा वर्षीय मुलीला तगादा लावण्याऐवढी रक्कम कशी दिली? अशी किती रक्कम होती ती? मुलीच्या आईने मृत मुलीलाच दोष देणारी विधाने का केली? या आर्थिक व्यवहारामागील खरा सूत्रधार अन्य कोणी आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

अजमेरा भागातील ‘शर्म’नाक असणाऱ्या एका महिलेसोबत या दुर्दैवी मुलीला जाताना  पाहिल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. या महिलेचा या आर्थिक व्यवहाराशी संबंध आहे का हे तपासणे आवश्यक असल्याचे मत पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे.

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. या मुलीच्या मृत्यूबरोबरच तिच्या प्रियकरानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे. म्हणजे एका अर्थाने दुहेरी हत्याकांड आहे. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची संवेदनशीलता पोलीस दाखवणार का हा खरा प्रश्न आहे.