अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला (video)

झाडांचं पुर्नरोपनण सुरु असताना झाडावरील मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदेंसह इतर लोकांना देखील माशा चावल्या.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला (video)

मुंबई - लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे नेहमीच वृक्षारोपणसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. दरम्यान कोल्हापूर-सातारा रस्ता रुंदीकरणात झाडं तोडली जात आहेत. यातील काही झाडं वाचवून महामार्गावरील झाडांच पुर्नरोपण सुरु असताना एक धक्कादायक घटना  घडली आहे.

झाडांचं पुर्नरोपनण सुरु असताना झाडावरील मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदेंसह इतर लोकांना देखील माशा चावल्या. मधमाश्यांच्या अचानक हल्ल्याने सर्वच गोंधळून गेले होते. सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला काही माश्या चावल्या आहेत. सयाजी शिंदे सुखररूप असून पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे.

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी काही वर्षांपूर्वी एका उपक्रमाची घोषणा केली होती.

राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत, त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईकडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले. त्या नंबरवर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जुनं आहे, ते कुठे आहे, ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची होती. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

https://www.youtube.com/watch?v=0v0c8WCzAFU