नागालँडमध्ये शरद पवार व रामदास आठवलेंची जादू चालली

नागालॅंड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागालँडमध्ये शरद पवार व रामदास आठवलेंची जादू चालली

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला ईशान्येत मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड विधानसभेत राष्ट्रवादीला काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप युतीला इथून ३७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर ३ नंबरवरील जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. त्यामुळे ६० जागांच्या विधानसभेत शरद पवारांच्या पक्षाचा आता थेट विरोधी पक्षनेता होणार आहे. रामदास आठवले यांच्या आरपीआयलाही इथे दोन जागांवर विजय मिळाला आहे. दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षात असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा कायम राहणार

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आता कायम राहण्याची शक्यता आहे. पवारांचे महाराष्ट्रातून ५२ आमदार आहेत. याशिवाय केरळमध्ये २, झारखंडमध्ये १ आणि नागालॅंडमध्ये ७ आमदार आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ४ खासदार आणि लक्षद्वीपमधून १ खासदार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पवारांनी सर्व नियमांची पूर्तता केल्यास २०२४ साली त्यांच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहण्याची शक्यता आहे.