राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी पोलिसांच्या ताब्यात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रबोधन न्यूज) - राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राखीने पतीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. राखीचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांच्या पैशांचा अपहार केला आहे. ७ फेब्रुवारी रोजी ओशिवरा पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतले. आदिलवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पैशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, राखीने एक ऑडिओ जारी केला ज्यामध्ये तिने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

राखी ऑडिओ क्लिपमध्ये म्हणते की, 'आदिल खान दुर्रानी नुकताच माझ्या घरी मला भेटायला आला होता. मी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. आदिल खान दुर्राणीला नुकतेच ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मी एफआयआर केला आहे. मी ओशिवरा पोलीस स्टेशनला पोहोचले आहे. राखी पुढे रडत रडत म्हणाली की, 'हे फक्त नाटक नाही. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मला त्याने मारले व माझे पैसे लुटले. कुराणावर हात ठेवूनही त्याने माझी फसवणूक केली आहे. मी माध्यमांना सत्याचे समर्थन करण्याचे आवाहन करते. मी सर्व पुरावे तुमच्यासमोर ठेवले आहेत.

मंगळवारी पुन्हा एकदा राखी मीडियासमोर आली. तिने सांगितले की, आज सकाळी आदिल तिला मारण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. राखीच्या जवळच्या मित्राने सांगितले की, आदिलची चौकशी केली जात आहे. त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. राखीचे आरोप सिद्ध झाल्यास त्याला  अटक केली जाईल.