खा. श्रीरंग बारणे यांची मंगळवारी पिंपरीतील व्यापारी प्रतिनिधी समवेत बैठक 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खा. श्रीरंग बारणे यांची मंगळवारी पिंपरीतील व्यापारी प्रतिनिधी समवेत बैठक 

पिंपरी - चिंचवड शहरातील व्यापारी हे वाहतूक समस्या आणि पथारी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे त्रस्त झाले आहेत. दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी होत असताना पोलिसांच्या पार्किंग कारवाईमुळे ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही त्रास होत आहे. कोट्यावधी रुपये गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दारात पथारी आणि फेरीवाले अतिक्रमण करून व्यापाऱ्यांवरच दादागिरी करीत आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी नेमलेले पथक निष्क्रिय ठरले आहे. या अतिक्रमणाबाबत तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यावरच पोलीस कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. या अडचणींवर चर्चा करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 18 ऑक्टोंबर) सकाळी 11 वाजता पिंपरी कॅम्प मधील बी. टी. आडवाणी (उबाडा) धर्मशाळेत सर्व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे.

या बैठकीस व्यापाऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, वाहतूक शाखेचे अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे महेश मोटवानी, नीरज चावला, प्रकाश पमनानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.