चार वर्षाच्या मुलाचा आपल्याच वडिलांच्या ट्रकखाली सापडून मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चार वर्षाच्या मुलाचा आपल्याच वडिलांच्या ट्रकखाली सापडून मृत्यू

चाकण (पुणे) - पुणे जिल्ह्यातील चाकण येथे एक हृदयद्रावक घटना घडलीय. एका चार वर्षांच्या मुलाचे वडील ट्रक चालवत होते. हा ट्रक रिव्हर्स घेताना ट्रक चालकाचा मुलगा मागे उभा होता. पण ट्रकचा धक्का लागला आणि तो खाली पडून ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. नकळतपणे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ट्रक चालकाच्या मुलाचा जीव गेलाय. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. अतुल निशाद असं मृत्यू झालेल्या चार वर्षांच्या मुलाचं नाव आहे.

आपल्या चुकीमुळे मुलाला गमावल्यामुळे अतुलच्या वडिलांवर मोठा धक्काच बसलाय. तर त्याच्या आईच्या मनावरही खोलवर आघात झालाय. मंगळवारी दुपारी अतुलचे बाबा त्याचा मिनी ट्रक मागे घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी मिनी ट्रक सुरु केला आणि रिव्हर्स गिअर टाकला. ट्रक मागे घेत असताना अतुल मागे उभा आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे पुढे अतुलच्या अंगावर मिनी ट्रकचं चाक गेलं. चाकाखाली येऊन चिरडला गेल्यानं चार वर्षांच्या अतुलला गंभीर जखम झाली. त्यातच त्याचा जीवही गेला.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेदनकरवाडी इथं ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अपघातप्रकरणी पोलिसांनी अतुलच्या वडिलांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. एका छोटाशा चुकीमुळे निष्पाप मुलाला गमवावं लागल्यानं संपूर्ण चाकणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.