संकल्पांना कृतीची जोड द्यावी - किरणराज यादव

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संकल्पांना कृतीची जोड द्यावी - किरणराज यादव

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - मानवी जीवनात कुतूहल आणि संकल्पनांना सातत्याने कृतीची जोड हवी. यामुळे संशोधन होतच राहणार आहे. या कुतूहलामुळे संशोधनातून नवनिर्मिती होतच राहील. या होणाऱ्या संशोधनामुळे देश प्रगतीपथावर आहोत, असे मत स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी व्यक्त केले.

निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल ॲन्ड कंप्युटर मॅनेजमेंट (आयआयसीएमआर)च्या वतीने सबका भारत-निखरता भारत या विषयावर "उडाण- 2022" या राष्ट्रीय स्तरीय अंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ऑटो क्लस्टरचे  व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंस्टिट्यूटचे अध्यक्ष जय ढोलकिया, पीसीएसआयसीचे व्यवस्थापक उदय देव, राजीव मांजरेकर, शशांक शिंदे, कला जनसेटचे व्यवस्थापकीय संचालक मनोज फुटाणे, बीव्हीजी ग्रूपचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, अभि. लॉजिस्टीकचे एमडी डॉ अभिजीत जोशी, डीजीझेनचे पंकज मित्तल, आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, एमबीएच्या विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या वेळी विविध कॉलेज व कंपन्यांनी १६० स्टार्टअप कल्पनांचे सदरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत आयडिया फेस्ट, स्टार्ट स्पीच, मॉक स्टॉक, बॉलिइमीटेशन, बिझनेस बाजार, कॉफी कॉर्पोरेट, गेमेथॉन यांचा सामावेश होता.

तसेच विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. तरुणांनी सुरू केलेल्या स्टार्टअपची यशोगाथा सांगितली. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फुड बाजाराचा पाहुणे व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे समन्वक प्रा. दिलीप पवार आणि प्रा. दीप्ती वाजपेयी यांनी काम केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरिमा बटब्याल आणि शोएब खान यांनी तर आभार प्रा. दिलीप पवार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मधुरा देशपांडे, डॉ. विनोद भेलोसे, डॉ. राजेंद्र आगवणे, डॉ. जयश्री मुरली, प्रा. स्वप्निशा खंबायत,  प्रा. हर्षल पाटील, प्रा. पूजा गावंडे, प्रा. पुजा नलावडे, डॉ. दीप्ती शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.