अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या बिष्णोई टोळीचा पर्दाफाश 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या बिष्णोई टोळीचा पर्दाफाश 

110 किलो पॉपी स्ट्रॉ, अफीम, पिस्टल, काडतूस जप्त 

पिंपरी, (प्रतिनिधी) - राजस्थान येथून पॉपी स्ट्रॉ (अफूच्या बोंडाचा चुरा) हा अंमली पदार्थ आणून पिंपरी-चिंचवड शहरात विक्री करणाऱ्या आंतरराज्य बिष्णोई टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला. 110 किलो पॉपी स्ट्रॉ, अफीमसह पिस्टल, तीन काडतुसांसह 18 लाख 59 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत माहिती काढत असताना पोलीस अंमलदार प्रदीप शेलार आणि संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, सांगवंडे गावात एकजण पॉपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थ विक्री करत आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जयप्रकाश साईराम खीचड (वय 24, रा. सांगवडे, ता. मावळ), महेश कुमार उर्फ श्‍याम बाखाराम बिष्णोई, विकास मोहनराम बिष्णोई या तिघांकडून 110 किलो पॉपी स्ट्रॉ, 56 ग्रॅम अफिम, एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे असा 18 लाख 59 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हा माल पप्पू उर्फ भगवानराम खमुराम बिष्णोई, सुरेशकुमार जगलागाराम सियाक बिष्णोई, (दोघे रा. सांगवडे, ता. मावळ. मूळ रा. राज्यस्थान) यांचा असून तो त्यांना सुरेशकुमार याचा भाऊ महिपाल जंगलानाराम सियाक बिष्णोई याने हा राज्यस्थान येथून घेऊन दिला. हा माल आरोपी विकास डाका बिष्णोई याच्या मदतीने पिंपरी चिंचवड शहरात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहाय्यक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडीक, पोलीस अंमलदार बाळासाहेब सुर्यवंशी, प्रदिप शेलार, दिनकर भुजबळ, संदिप पाटील, मयुर वाडकर, संतोष भालेराव, मनोज राठोड, प्रसाद कलाटे, दादा घस, अशोक गारगोटे यांनी केली.