थायलेसिमिया रुग्णांसाठी मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटर सुरू
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
चिंचवड, (प्रबोधन न्यूज) - थायलेसिमिया असणाऱ्या प्रत्येक लहान मुलांना रक्त भरण्यासाठी करावी लागणारी वणवण आता थांबणार आहे. ‘Helping Hands For Blood आणि ‘सुविधा मल्टीस्पेशेलिटी अँड आय.सी.यु हॉस्पिटल’च्या माध्यमातून महाराष्ट्रातले पहिले मोफत खाजगी “Blood Transfusion Center” सुरू करण्यात आले आहे.
पैशांअभावी रक्त भरण्यासाठी, हवे ते रक्त मिळवताना होणारी तळमळ-धावपळ, अगतिकता, या साऱ्या त्रासापासून थायलेसिमिया असणाऱ्या लहान मुलांच्या पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. रक्तासाठी सरकारी रुग्णालयात होणारी परवड तसेच खासगी रुग्णालयाच्या बिलापासून काही अंशी सुटका होणार आहे.
राहुल सिद्धार्थ साळवे, डॉ. केतनकुमार गायकवाड आणि डॉ. स्वप्नील पाटील यांच्या संकल्पनेतून थायलेसिमीया असणाऱ्या लहान रुग्णांसाठी सुविधा मल्टीस्पेशेलिटी अँड आय.सी.यु. हॉस्पिटल’ संभाजीनगर, चिंचवड पुणे येथे मोफत Blood Transfusion ची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटरचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आर्यन आखाडे, सुविधा मल्टीस्पेशेलिटी अँड आय.सी.यु. हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील आणि डॉ. केतनकुमार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. धीरज सोनी ( CEO सुविधा हॉस्पिटल ), डॉ. योगेश पाटील, के. अभिजीत, मिलिंद दामोदरे आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
येत्या काही वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी असे मोफत ‘Blood Transfusion Center’ ‘हेलपिंग हॅन्ड फॉर ब्लड च्या माध्यमातून सुरु करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.