तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड कुठलीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने कारवाई करत तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 26) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास थेरगाव येथे करण्यात आली.
आकाश रंगनाथ चव्हाण (वय 26 रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार रामभाऊ मोहिते यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 15 सप्टेंबर 2022 रोजी एक वर्षाकरिता पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.  तडीपारीचा आदेश असताना देखील आरोपी हा थेरगाव परिसरात असल्याचे पोलिसांना खबर मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याला अटक केली असता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता ही मिळून आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.