कष्टकरी जनता आघाडीतर्फे त्यागमूर्ती रमामाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, दि. 27 मे - सामाजिक परिवर्तनाचा मोठा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण करून इतिहास रचला. उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. बाबासाहेब समाजपरिवर्तनाचा लढा उभारत असताना दुसरीकडे कुटुंबाची अखंड जबाबदारी माता रमाई यांनी उचलली. बाबासाहेबांच्या माघारी कुटुंबाचा डोलारा योग्य पद्धतीने सांभाळला. या मधून माता रमाईं यांचे व्यक्तिमत्व कणखर आणि लढाऊ असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.
माता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी जनता आघाडीतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, खलील मकानदार, जुगनू शेख, मोहम्मद शेख, रेखा भालेराव, सुनिता सरकटे, सुनिता यशवंते आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, माता रमाईंचा त्याग हा देश कधीच विसरणार नाही. त्यांनी बाबासाहेबांना योग्य साथ दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील मजूर, कष्टकरी, कामगार वर्गावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. संविधानामार्फत कष्टकऱ्यांच्या कामाचे तास कमी केले. यासह विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांसाठी उपलब्ध करून दिला. त्यामुळे कष्टकरी जनतेच्या मनात देखील बाबासाहेबांच्या विषयी आदराची भावना आहे. माता रमाई यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानेच बाबासाहेबांनी कष्टकऱ्यांसाठी मोठे काम उभारले. त्यामुळे बाबासाहेबांबरोबर माता रमाई यांच्याबाबतीतही कष्टकऱ्यांमध्ये आदराचे आणि प्रेरणेचे स्थान असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.