महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृती - योगेश बहल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार
पिंपरी, दि. 27 मे - चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका करून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. सुप्रिया सुळे यांचे यशस्वी राजकारण पाटील यांना खुपत असल्यानेच त्यांनी ही टीका केली असून, महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृतीच असून, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांची माफी न मागितल्यास त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात पायही ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणावरून भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘घरी जा आणि स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा’ अशा अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश बहल यांनीही चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या तीन वेळच्या खासदार आहेत. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत नेतृत्त्व म्हणून त्या पुढे आल्या आहेत. त्यांना आतापर्यंत आठ वेळा संसदरत्न म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न त्या तळमळीने मांडत असल्याने त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आणि हीच बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना खुपत आली आहे.
एका सुसंस्कृत आणि यशस्वी राजकारणी महिलेवर चंद्रकांत पाटील यांनी खालच्या शब्दात टीका करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. भाजपाची मनोवृत्तीच महिलांविरोधी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला आहे. महिलांचे राजकारणातील नेतृत्त्व भाजप नेत्यांना मान्य नसल्याचेच यावरून अधोरेखीत होत आहे. खालच्या भाषेत टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील हे मनोरुग्ण बनले असून त्यांच्या मेंदूची तपासणी करणे गरजेचे बनले असल्याचा टोलाही बहल यांनी लगावला आहे.
एका महिलेच्या हक्काची जागा बळाकावून चंद्रकांत पाटील हे आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना महिलांप्रती आदर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेले हे वक्तव्य शुद्धीत केले की नशापाणी करून केले हे देखील तपासण्याची गरज आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या मेहनती आणि यशस्वी महिलेबाबत विधान करणारे चंद्रकांत पाटील यांचे सर्वसामान्य महिलांबाबतचे मत किती दळभद्री असू शकते. त्यामुळे सुळे यांच्यावर टीका करून संपूर्ण महिलांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी, अन्यथा पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना पायही ठेवू देणार नाही, असा इशाराही योगेश बहल यांनी दिला आहे.
शरद पवार आरक्षणाचे पाठिराखे
शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने देशभर पोहोचविणारे शरद पवार हेच खरे आरक्षणाचे पाठिराखे असल्याचे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून अनेकदा सिद्ध केले आहे. मंडल आयोगाने ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी देशात सर्वांत प्रथम महाराष्ट्रात केली होती. शरद पवार हेच ओबीसी समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देऊ शकतात, याची सर्वांना खात्री आहे. मात्र आरक्षणाचे केवळ राजकारण करून लोकांना भ्रमीत करणाऱ्या आणि आरक्षणविरोधी मानसिकता असलेल्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने चंद्रकांत पाटील अभद्र टीका करत आहेत. तसेच शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला असल्यानेच भाजप नेते महिलांवर खालच्या भाषेत टीका करत असल्याचा आरोपही बहल यांनी केला आहे.