नॉमिनेशन : अर्थ आणि व्याप्ती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नॉमिनेशन : अर्थ आणि व्याप्ती

(अ‍ॅड. तन्मय केतकर, अँडव्होकेट, मुंबई हायकोर्ट)

ल्लीच्या सोसायटीच्या जमान्यात सोसायटी शेअर सर्टिफिकेट हस्तांतरणाकरिता नॉमिनेशन केले की आपल्या पश्चात मालमत्तेची व्यवस्था लावण्याचे काम पूर्ण झाले, आता काहीही करायची आवश्यकता नाही असा बहुतांश लोकांचा आजही गैरसमज आहे.

नॉमिनेशन ही एक कायदेमान्य व्यवस्था आहे यात काहीही वाद नाही, मात्र नॉमिनेशन केले की निर्धास्त व्हावे अशी परिस्थिती निश्चितच नाही. कारण नॉमिनेशन ही एक रूढ आणि सोप्पी पद्धत असली तरीसुद्धा तिला काही कायदेशीर मर्यादा आहेत. नॉमिनी म्हणजे नक्की काय? त्याचा कायदेशीर दर्जा काय? हे विविध खटल्यांच्या निकालात वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार नॉमिनीचा दर्जा हा मालकाचा नसून विश्वस्ताचा आहे. जिथे एकापेक्षा अनेक वारस असतील आणि त्यापैकी एखाद्याच वारसाला नॉमिनी नेमले असेल, तर तो नॉमिनी पूर्ण मालक न होता इतर वारसांच्या हक्काकरिता विश्वस्त होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेकांपैकी एकाला नॉमिनी केले म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपुष्टात येत नाही, इतर वारस यथायोग्य न्यायालयात दाद मागून आपला हक्क व हिस्सा निश्चितपणे मिळवू शकतात. असे झाले तर एकाच वारसाला नॉमिनी नेमले म्हणजे त्यालाच सगळे मिळेल हा उद्देश पूर्णत: विफल होतो.

नवऱ्याने घेतलेल्या मालमत्तेत बायकोला नॉमिनी करणे बंधनकारक आहे हा नॉमिनेशनबद्दल अजून एक अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. सद्यस्थितीत प्रचलित कोणत्याही कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने एखाद्या विशिष्ट व्यक्तीस किंवा नातेवाईकास नॉमिनी नेमण्याची सक्ती नाही. स्वष्टार्जित मालमत्तेबाबत मालकाला पूर्ण तर वडिलोपार्जित मालमत्तेबाबत आपापल्या हक्क आणि हिश्श्यापुरते अधिकार असतात. साहजिकच अशा कोणत्याही अधिकारांचे नॉमिनेशन विशिष्ट व्यक्तीस करण्याची सक्ती म्हणजे त्या अधिकारांवर अतिक्रमण ठरणार असल्याने अशी तरतूद सध्या अस्तित्वात नाही आणि भविष्यातदेखील अस्तित्वात येण्याची शक्यता जवळपास नाहीच असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नॉमिनेशन केल्याने अंतिम हेतू साध्य होण्याची खात्री नसेल तर मग यावर उपाय काय? तर आपल्या मालमत्तेची आपल्या मनानुसार आपल्या पश्चात व्यवस्था लावण्याकरता वेळीच मृत्युपत्र करून ठेवणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. नॉमिनेशनप्रमाणे मृत्युपत्राची व्याप्ती मर्यादित नसल्याने, मृत्युपत्रानुसार आपण ज्याला जे देऊ त्याला ते मालक म्हणून मिळेल आणि उपभोगता येईल. मृत्युपत्र करतानासुद्धा स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्तेतील भेद लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत काहीही करण्याचा संपूर्ण अधिकार मालकाला असतो, मात्र वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा असा अधिकार मर्यादित असतो हे ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मृत्युपत्र म्हटले की आजही अनेकांच्या भुवया उंचावतात आणि ‘एवढय़ात काय घाई आहे? निवांत म्हातारपणी करू’असा विचार बहुतांश लोक करतात. निधन जेवढे निश्चित आहे, तेवढीच त्याची वेळ अनिश्चित आहे हे लक्षात घेऊन आपण शक्य तेवढय़ा लवकर आपापले कायदेशीर मृत्युपत्र करणे गरजेचे आहे. मृत्युपत्र केले आणि नंतर परिस्थिती बदलली तर काय? हा अजून एक प्रश्न अनेकांच्या मनात असेल. प्रत्येक नवीन मृत्युपत्र आधीची सगळी मृत्युपत्रे आपोआप रद्द करत असल्याने, बदलत्या परिस्थितीत आपण नवीन मृत्युपत्र करू शकतो, त्यामुळे त्याबाबतीतसुद्धा धास्ती बाळगायची काहीच आवश्यकता नाही. अर्थात मृत्युपत्र करणे ही सक्तीची नसून ऐच्छिक बाब असल्याने आपल्या मनानुसार आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावून, आपल्याच वारसांमध्ये होणारे संभाव्य तंटे आणि खटले टाळायचे की नाही हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. 

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनी लाच पैसे मिळतील का ?

वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Of-cource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो ! तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ?

तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड, जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ?

तर उत्तर आहे - नाही

शॉकिंग ???

खालील उदाहरण पहा !

महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायकोच्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे. अचानक महेशचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मुलं संपत्तीसाठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांमध्ये समान भाग केले आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला !

असे का झाले ?

महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal Will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succession Law' (वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व  'Legal Heir' (वारसदार) मध्ये  समान वाटणी झाली.

'Succession Law' समजून घ्या !

'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे, मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळज़ी घेऊन ती legal Heirs ला सुपूर्द करण्यापर्यंत  मर्यादित आहे.

नॉमिनी अस्सेटला होल्ड करू शकतो पण असेस्ट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात.

मग 'Legal Heir' कोण असतात?

'Legal Heir' ते असतात जे Succession Act मधे नमूद केलेले आहेत.

जर तुम्ही Will बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succession Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात.

'Succession Law' चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत.

मित्रानो इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे. नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनीला हवा तेवढा फायदा होणार नाही !                              नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो. मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे!

आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरुन आपल्या वारसांमधे भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर 'मृत्यूपत्र' बनवणे अतिशय महत्वाचे असते.

सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नॉमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नॉमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमची प्रॉपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो.

सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आहे वाचा व वेळीच  सावध व्हा...