सूर्यग्रहणाच्या काळात 'हे' काम करायला विसरू नका, अन्यथा होऊ शकते नुकसान !

सूर्यग्रहणाच्या काळात 'हे' काम करायला विसरू नका, अन्यथा होऊ शकते नुकसान !

मुंबई - सूर्यग्रहण ही एक अशी घटना आहे, ज्याला विज्ञानापासून धर्म आणि ज्योतिषशास्त्रापर्यंत खूप महत्त्व आहे. 2022 मधील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे. अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात त्याला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा स्थितीत काही कामे टाळावे. मात्र, भारतात हे आंशिक सूर्यग्रहण असेल. त्यामुळे सुतक कालावधी वैध नसला तरी या काळात काही खबरदारी घ्यावी. अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया, शास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावे आणि कोणते टाळावे.
ग्रहणकाळात विसरूनही हे काम करू नका

० नवीन काम सुरू करू नका
ग्रहणकाळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे कोणतेही नवीन काम करू नका किंवा शुभ कार्य करू नका. याशिवाय ग्रहणकाळात नखे कापणे, केस विंचरणे हेही योग्य मानले जात नाही.

० ग्रहण काळात शिजवलेले अन्न खाऊ नका
शास्त्रानुसार ग्रहण काळात शिजवलेले काहीही खाल्ल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत या काळात शिजवलेले अन्न खाण्यास मनाई आहे. याशिवाय या काळात भाज्या चिरणे व सोलणे अशी कामे करू नयेत. 

'या' गोष्टी टाळा
. ग्रहण काळात झोपू नये असे म्हणतात. तसेच, सुईमध्ये दोरा ओवण्यास मनाई आहे. याशिवाय ग्रहण काळात प्रवास करणेही टाळावे.
. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच या काळात गरोदर महिलांनी चाकू-कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू वापरू नये आणि या वस्तू हातात घेऊ नये. याचा अर्भकावर वाईट परिणाम होतो.

० ग्रहण काळात काय करावे ?
जर घरात शिजवलेले अन्न ठेवले असेल तर ग्रहणकाळात अन्न आणि पाणी इत्यादीमध्ये तुळशीची पाने टाकावीत, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू नये आणि ग्रहणानंतर त्यांचे सेवन करता येईल.

० ग्रहण काळात घरातील मंदिर झाकून ठेवा. तसेच या काळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दान करावे.