'या' लाखोबांनी गंडवले तब्बल २५५ महिलांना ! केली कोट्यवधी रुपयांची फसवणूक 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'या' लाखोबांनी गंडवले तब्बल २५५ महिलांना ! केली कोट्यवधी रुपयांची फसवणूक 

पिंपरी -

आजच्या काळातही समाजात अनेक 'लखोबा लोखंडे' उजळ माथ्याने वावरत असल्याचे एका घटनेवरून सिद्ध झाले आहे. उच्च पदावर काम करत असल्याचे भासवून दोन ठगांनी पुणे, बेंगलोर आणि गुडगाव येथील तब्बल 255 महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. तसेच काही महिलांचा लैंगिक छळ केला. नाव बदलून राहणाऱ्या या दोन 'लखोबांना' ठगांना वाकड पोलिसांनी बेंगलोरमधून बेड्या ठोकल्या. निशांत रमेशचंद नंदवाना (वय 33, रा. किशनगंज, बांरा, राजस्थान), विशाल हर्षद शर्मा (वय 33, रा. कोटा राजस्थान. दोघे सध्या रा. शोभा पॅलेडीयन, मराठाहल्ली, बेंगलोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन महिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

विवाह संकेतस्थळावरुन एका इसमाने त्याचे प्रोफाइल पाठवून महिलेला महागड्या गाडीतून येवून भेटून ओळख वाढवली. सेन्ट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट मध्ये चीफ प्रोजेक्‍ट मॅनेजर असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर एका प्रोजेक्‍टसाठी 60 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगून महिलेकडून 13 लाख रुपये घेतले. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये वरील गुन्हयातील आरोपीबरोबर राहणाऱ्या आरोपीने दुसऱ्या मुलीबरोबर अशाच प्रकारे तो केंद्र शासनाच्या ऍग्रीकल्चर विभागामध्ये डेप्युटी डायरेक्‍टर पदावर कार्यरत असल्याचे सांगून पाच लाखांची आर्थिक फसवणूक व लैंगिक छळ केला.

पोलिस तांत्रिक माहितीच्या आधारे बेंगलोर येथे पोचले. आरोपींवर उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्वीगी बॉय म्हणून पाळत ठेवली. आरोपींची खात्री होताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी अलिशान फ्लॅटमध्ये अभय कश्‍यप व अथर्वन तिवारी या बनावट नावाने राहत होते. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली होती. पोलिसांनी आरोपींकडून 75 लाखांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये त्यांनी पुण्यातील 91 मुली, बेंगलोर येथील 142 मुली, गुडगाव येथील 22 मुलींच्या संपर्कात राहून सुमारे दीड कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलींची संख्या आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. अशा प्रकारे बळी पडलेल्या मुली व महिलांनी तात्काळ वाकड पोलीस स्टेशन (9422008804 / 9823865502) येथे संपर्क करावा.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, बालाजी ठाकुर, उपनिरीक्षक गणेश तोरगल, संगीता गोडे, कर्मचारी दिपक भोसले, विक्रम कुदळ, वंदू गिरे, भास्कर भारती, कौंतेय खराडे, शाम बाबा, कल्पेश पाटील, दत्तात्रय इंगळे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापुसाहेब धुमाळ, दिपक साबळे, विजय गंभीरे, प्रमोद कदम, आतिश जाधव, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, राजेंद्र काळे, विकांत चव्हाण, अजय फल्ले, देवा वाघमारे, सतोष महाजन, नूतन कोडे यांनी  तपासकाम केले.