ऑडी Q7 फेसलिफ्ट एसयूव्ही 'या' दिवशी लॉन्च होत आहे, 6 सेकंदात 100 किमी प्रतितास पकडते वेग !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ऑडी Q7 फेसलिफ्ट एसयूव्ही 'या' दिवशी लॉन्च होत आहे, 6 सेकंदात 100 किमी प्रतितास पकडते वेग !

नवी दिल्ली -

ऑडी इंडियाने भारतात 2022 Q7 फेसलिफ्ट (2022 Q7 facelift) SUV लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. जर्मन कार निर्माता पुढील महिन्यात त्यांच्या फ्लॅगशिप थ्री-रो एसयूव्हीची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करेल. ऑडी इंडियाने घोषणा केली आहे की  ऑडी Q7 फेसलिफ्ट एसयूव्हीची किंमत 3 फेब्रुवारी रोजी त्याच्या लॉन्चिंगच्या दिवशी जाहीर केली जाईल. कार निर्मात्याने यापूर्वी जानेवारीमध्ये एसयूव्ही सादर केली होती. ही SUV जवळपास दोन वर्षांनी नवीन इंजिनसह भारतात पुनरागमन करत आहे.

० बुकिंग रक्कम
जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने त्याच्या आगामी प्रीमियम SUV 2022 Q7 फेसलिफ्टसाठी अधिकृतपणे बुकिंग आधीच उघडले आहे. Audi ने 2022 Q7 फेसलिफ्टसाठी बुकिंग रक्कम 5 लाख रुपये निश्चित केली आहे. ऑडी इंडियाने औरंगाबाद येथील SAVWIPL उत्पादन प्रकल्पात स्थानिक पातळीवर नवीन 2022 Q7 फेसलिफ्ट कारचे उत्पादन सुरू केले आहे.

० दोन ट्रिममध्ये येते
Q7 दोन ट्रिममध्ये उपलब्ध असेल - प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) - लॉन्चवेळी. दुसऱ्या पिढीतील Q7 फेसलिफ्ट SUV Q5 फेसलिफ्ट SUV मध्ये सुधारणा करून पुनरागमन केल्यानंतर काही महिन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल. नवीन BS-VI इंधन उत्सर्जन निकषांच्या अंमलबजावणीनंतर Audi ने एप्रिल 2020 मध्ये भारतीय बाजारपेठेतील Q7 बंद केले.

० इंजिन आणि शक्ती
Q7 फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल इंजिनमध्ये करण्यात आला आहे. SUV मध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह नवीन 3.0-लिटर V6 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन जास्तीत जास्त ३४० एचपी पॉवर आणि ५०० एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

० सर्वोच्च वेग
ते 6 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि त्याचा सर्वाधिक वेग 250 किमी प्रतितास आहे. Q7 फेसलिफ्ट मानक क्वाट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमसह देखील येईल.

० लूक आणि स्टाईल 
ऑडी Q7 ची फेसलिफ्टेड आवृत्ती लूक आणि डिझाइनच्या बाबतीत, त्याच्या नवीन अवतारमध्ये बाहेरील तसेच केबिनच्या आत अनेक कॉस्मेटिक अद्यतनांसह येईल. याला नवीन ऑडी क्यू फॅमिली रेंजप्रमाणेच पुन्हा डिझाइन केलेला फ्रंट लुक मिळेल. यामध्ये नवीन सिग्नेचर डे टाईम रनिंग लाइट्स, क्रोम फ्रेमसह रीडिझाइन केलेले ग्रिल, मॅट्रिक्स एलईडी हेडलँप यांचा समावेश आहे. मोठ्या एअर इनटेक आणि नवीन अलॉय व्हील्ससह एक नवीन बंपर देखील आहे. मागील बाजूस, Q7 क्रोम ट्रिमला नवीन एलईडी टेललाइट्स मिळतात.

० फीचर्स 
कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SUV मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-झोन क्लायमेट कंट्रोलसाठी 8.6-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आणि 12.3-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी फिचर्स  दिली जाऊ शकतात. 7- सीटर SUV ची लांबी 5,063 मिमी, रुंदी 1,970 मिमी, उंची 1,741 मिमी आहे आणि तिचा व्हीलबेस 2,995 मिमी असेल.

० स्पर्धा
लॉन्च केल्यानंतर, नवीन Q7 ची भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज-बेंझ GLS, बीएमडब्ल्यू X7 (BMW X7), व्हॉल्वो XC90 (Volvo XC90) आणि लँड रोव्हर Discovery शी स्पर्धा होईल.

० अंदाजे किंमत
तथापि, 2022 ऑडी Q7 फेसलिफ्ट SUV ची किंमत 3 फेब्रुवारी रोजी लॉन्च झाल्यावर उघड होईल. पण रिपोर्टनुसार त्याची किंमत 80 लाख रुपयांपर्यंत असू शकते.