खासगी रुग्णालयांमध्ये रॅपिड अँन्टीजेन टेस्टची मागणी ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करणार्या केंद्रांवर हजारोंच्या संख्येने गर्दी होत आहे. शहरात शेकडो रुग्णालये असतानाही त्यांना रॅपिड टेस्टची परवानगी दिली जात नाही. नागरिकांची गरज लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांना रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शहरात शेकडो खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी अनेक रुग्णालये सध्या कोविडसाठी समर्पित करण्यात आली असून त्या ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असतानाही रॅपिड व आरटीपीसीआर या करोनाच्या टेस्ट केवळ महापालिका रुग्णालयांमध्ये सुरू आहेत.
राज्य शासनाने कोणतीही अस्थापना सुरू करावयाची असल्यास अथवा प्रवास करावयाचा झाल्यास करोना टेस्ट बंधनकारक केल्याने महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर हजारोंच्या संख्येने गर्दी होत आहे. त्यातून संसर्ग अधिकच पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाबींचा विचार करून खासगी रुग्णालयांना रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी दिल्यास महापालिका रुग्णालयांवरील ताण कमी होईल तसेच टेस्ट करण्याचे प्रमाणही वाढेल, या बाबींचा विचार करून खासगी रुग्णालयांना टेस्ट करण्याची परवानगी देण्यात यावी.