राज्यात कडक लॉकडाऊन लागणार !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली असून या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलं आहे. मात्र याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्या जाहीर करतील, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज्यामध्ये करोनाचे धडकी भरविणारे आकडे समोर येत आहेत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे नियंत्रणात आणायचे असतील तर कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही माणसं फिरतायत, वाहनं फिरतायत, नंबर खाली येत नाहीयेत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजनच्या गाड्यांना राज्यांत येण्यापासून अडथळा निर्माण होणार नाही. ऑक्सिजनच्या गाडीला ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता असल्यास तोसुद्धा घेण्यात आलाय. त्यामुळे ऑक्सिजनच्या गाड्यांना राज्यांत येण्यापासून अडथळा निर्माण होणार नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.