पुन्हा दिसला मयूर शेळकेमधील देव ! बक्षिसातील २५ हजार दिले 'त्याच' चिमुकल्याच्या अंध मातेला !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अंबरनाथ, (प्रबोधन न्यूज) - वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेमधील देवाचं दर्शन पुन्हा एकदा झालं. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम त्या चिमुकल्याची अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. आधी शौर्य गाजवून अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकणाऱ्या मयूरने आता त्याच्यातील दानतही दाखविली आहे.
संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार असून त्याला वाचवणारा मयुर हा या अंध मातेसाठी खऱ्या अर्थानं देवदूत ठरला आहे.
मयुर शेळकेने काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अगदी रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्याचं कौतुक केलं होतं. रेल्वेकडून त्याला पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं. लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याशिवाय जावा कंपनीनेही मयुर शेळकेला बाईक भेट देण्याची घोषणा केली आहे.