समीर वानखेडेंपासून जीवाला धोका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

समीर वानखेडेंपासून जीवाला धोका


आर्यन खान प्रकरणाला नविन वळण

ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या

सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.

मुंबई - ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर सेल यांने केला आहे. केपी गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे.

प्रभाकर सेलने म्हटलंय की तो गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असं त्याने सांगितलं. दरम्यान, क्रूझवर झालेल्या जप्तीच्या कारवाईबद्दल माहिती नसल्याचाही दावा त्याने केलाय. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिल्याचंही म्हटलंय.

क्रूझवर छापेमारीच्या वेळी आपण काही व्हिडिओ आणि फोटो काढले होते, असंही प्रभाकरने सांगितलं. त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये गोसावी आर्यन खानला फोनवर कोणाशी तरी बोलायला लावताना दिसत आहे. दरम्यान, प्रभाकर सेलने केलेल्या आरोपांनंतर या छापेमारी संदर्भात आणि एनसीबी अधिकाऱ्यांसह केपी गोसावीच्या भूमिकेबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.