उत्तर कोरियाचा हटवादीपणा ; 2022 च्या पहिल्या आठवड्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांनी नवीन वर्षात आपली भूमिका बदललेली नाही. बुधवारी, उत्तर कोरियाने 2022 च्या पहिल्या आठवड्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून नवीन वर्षात आपला आक्रमक इरादा कायम ठेवला आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण कोरिया आणि जपानमधील तणाव आणखी वाढू शकतो.
उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनार्यावरून एक संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. यासोबतच त्यांनी आपला नेता किम जोंग उन यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. अस्थिर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशाच्या सैन्याला बळकट केले जाईल, असे किम जोंग यांनी नुकतेच सांगितले.
जपानच्या तटरक्षक दलाने प्रथम उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र पाहिले. ते म्हणतात की ते बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असू शकते. यानंतर देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ते सुमारे 500 किलोमीटर दूर गेले. जपानचे पंतप्रधान फुमिया किशिदा यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे.
अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाने हे क्षेपणास्त्र डागले, ते बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असू शकते, असेही दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करप्रमुखांनी सांगितले. आमची लष्करी तयारीही पूर्ण झाल्याचे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आमचे सैन्य अमेरिकेशी जवळचे सहकार्य राखून त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाकडून अलीकडे अशा प्रकारे क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलावून चिंता व्यक्त केली आहे. अंतर्गत आणि जागतिक स्थिरता आवश्यक असताना उत्तर कोरियाने हे क्षेपणास्त्र डागले, असे परिषदेने म्हटले आहे. आम्ही उत्तर कोरियाला चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन करतो.
उत्तर कोरियाने नवीन वर्षात पुन्हा क्षेपणास्त्र डागून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे निर्बंध झुगारून दिले आहेत. सुरक्षा परिषदेने सर्व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर आणि त्यावरील अणुचाचण्यांवर बंदी घातली आहे. त्याच्याशी संबंधित प्रचारांवरही बंदी घालण्यात आली आहे.