सील केलेल्या सदनिकेवर ताबा; तिघांवर गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सील केलेल्या सदनिकेवर ताबा; तिघांवर गुन्हा दाखल

  पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  कर्जाची परतफेड न केल्याने सील केलेल्या सदनिकेवर ताबा मारल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 जून रोजी सकाळी कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

संतोष कांतीलाल शिंदे (वय 41, रा. स्वारगेट) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेख चांदसाहब हुसेन (रा. कस्पटेवस्ती, वाकड) आणि त्यांच्या दोन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील एम आर इंजिनिअरिंग या कंपनीतर्फे चांदसाहब आणि शेख यास्मिन चांदसाहब यांना डिसेंबर 2017 मध्ये एक कोटी 39 लाख 39 हजार 165 रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. पुढे आरबीआयच्या आदेशाने आणखी 24 लाख 90 हजार रुपये देण्यात आले. मात्र कर्जाची परतफेड करणे चुकवल्याने कंपनीने केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी चार सदनिका जप्त करण्याचे आदेश दिले. मुळशीची निवासी नायब तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्तात चार सदनिका सील केल्या. त्यानंतर आरोपींनी त्या सदनिकांमध्ये सील तोडून गृहतीक्रमण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.