धक्कादायक ! दुचाकीला धक्का लागल्याने रिक्षा चालकाचा खून
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) - पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्याने झालेल्या वादातून दोन तरूणांनी रिक्षा रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खून केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात घडली.
ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर पसार झालेल्या दोघांना दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. किरण राजू दांडेकर (30, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुकील गफुर शेख (रा. कोंढवा) आणि अरबाज मेहबुब शेख (रा. काशेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मृत किरण यांचा भाऊ मधुकर राजू दांडेकर याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास किरण दांडेकर, त्याचा भाऊ मधूकर दांडेकर, बंटी कसबे, निलबा, राजू हे किरणच्या रिक्षातून गॅस भरण्यासाठी भापकर पेट्रोल पंपाकडे जात असताना दुचाकीवर असलेल्या मुकील आणि आरबाज यांच्या दुचाकीला रिक्षा घासल्याने आरोपी आणि किरण यांच्यात वाद झाले. त्याच्या वादाचे पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. यावेळी चाललेल्या भांडणात आरोपीपैकी एकाने किरणच्या छातीवर जोरात लाथ मारली. तो बेशुध्द होऊन खाली पडल्याने त्याच्या त्याचा या मारहाणीत मृत्यू झाला.
त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारपूर्वीच किरणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासात माहिती मिळालेल्या आरोपींच्या दुचाकीच्या चार अंकी नंबरवरून पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींचा माग काढून लपून बसलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांनी घटनास्थही भेट दिली. पुढील तपास उप निरीक्षक एस. टी. जगदाळे करत आहे.