नाना काटेंच्या प्रचार फेरीत महिलांचा लक्षणीय सहभाग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नाना काटेंच्या प्रचार फेरीत महिलांचा लक्षणीय सहभाग
  • महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य करणार - नाना काटे
  • प्रभाग क्रमांक २६ मध्ये प्रचारफेरी

पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) - शुक्रवारी (दि. 17) सकाळपासून महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांची प्रचारफेरी निघाली. या प्रचारफेरीत नागरिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. प्रचारफेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता: या प्रचारफेरीत महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या. माता -भगीनींचा लक्षणीय सहभाग, मतदारांचा मिळणारा प्रतिसाद आणि राष्ट्रवादीच्या जयघोषात निघालेल्या या प्रचारफेरीने प्रभाग क्रमांक २६ चा परिसर राष्ट्रवादीमय बनला होता. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी नाना काटे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिली:

तर सकाळी 9 ते 2 या सत्रात प्रभाग क्रमांक 26 मधील प्रेमलोक पार्क, बिजली नगर, नगरसेवक माऊली सुर्यवंशी यांचे बिजली नगर येथील कार्यालय, स्पाईन रोड, शिवनगरी दगडोबा चौक, चिंचवडे चौक, गिरिराज सुखनगरी, घुमाऊली गार्डन, प्रेमलोक पार्क, इंदिरा नगर, दळवी नगर, रेल्वे गेट या परिसरातून नाना काटे यांची प्रचारफेरी पार पडली.

या प्रचारफेरीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रसिंग वालिया, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य दिलीप काळे, माजी नगरसेविका उषा काळे, माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, शाम लांडे, राहूल भोसले, शिवसेना नेते हरीष नखाते, राष्ट्रवादीचे नेते विजयराव सुतार, काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे, ड. प्रभाग मा. स्वीकृत सदस्य नवनाथ नढे, युवा कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, विवेक तापकीर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष संतोष काटे, सचिन काळे, रवी नागरे, सुभाष लोंढे, बजरंग नढे, सनी नढे, नीलेश मराठे, संगीताताई कोकणे, इलियास सय्यद, अश्विनी तापकीर, सुजाता नखाते, मोनिका नढे, हेमंत काटे, चेतन काटे, योगेश काटे, अंकित काटे, धनंजय मेटे, बापू जंजाळे, हितेश ढगे, दीपक अंकुश, मनोज म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रचारफेरीदरम्यान नाना काटे यांनी मतदारांची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा उपस्थित नागरिकांनी, विषेशतः महिलांनी आपल्या अडचणी, परिसराच्या विकासाबद्दलच्या अपेक्षा नानांकडे व्यक्त केल्या. प्रेमलोक पार्क येथील महिलांनी नाना काटे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगाराची संधी मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणार असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच धोरण राबवू, असे आश्वासन नाना काटे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, या प्रचारफेरीत 'नाना काटे आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'येऊन येऊन येणार कोण? नानांशिवाय दुसरं आहेच कोण?' राष्ट्रवादी पुन्हा अशा जोरदार घोषणा देत महिलांनी अवघा परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत महाविकास आघाडीच्या अन्य घटकपक्षातील महिला कार्यकर्त्यांनी तसेच चिंचवड मतदारसंघातील महिलांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी चिंचवड मतदारसंघात प्रचाराची मोठी आघाडी घेतली असून त्यांना समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलावर्गातही त्यांना आदराचे स्थान असून त्या नाना काटेंच्या प्रचार फेरीत हिरीरीने सहभागी होत असल्याचे चित्र दिसले.

  • पिंपरी-चिंचवडच्या महिलांना हवे विकासाचे घड्याळ !
  • भाजपच्या सत्ताकाळातील पाच वर्षे बेरोजगारी, महागाई आणि असुरक्षिततेच्या गर्तेत अडकलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांना आता विकास हवाय. या शहराचा विकास केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या दिग्गज आणि दूरदृष्टीच्या नेत्यांनी केला हे शहरवासीय कधीच नाकारणार नाहीत. आमची लढाई भाजपाशी आहे. कोणत्याही व्यक्तीशी नाही. आम्ही विकासासाठीच लढणार आहोत. नाना काटे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आमच्या महिलांना आता विकासाचेच घड्याळ पुन्हा हवे आहे !
  • ज्योतीताई कोकणे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्षा