अदानीवरून संसदेत गदारोळ, उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीवर विरोधक ठाम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अदानीवरून संसदेत गदारोळ, उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीवर विरोधक ठाम

फक्त अदानींचा घोटाळा नसून तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोटाळा आहे – संजय सिंह

नवी दिल्ली, (प्रबोधन वृत्तसेवा) - देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (अदानी एंटरप्रायजेस) यांच्यावरील हिंडेनबर्ग अहवालातील खळबळजनक आरोपानंतर विरोधकांनी संसदेत सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. सरकारवर आरोप करत विरोधकांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. गौतम अदानींच्या अहवालाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू केला. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपनीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. या प्रकरणाची चौकशी जेपीसी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी विरोधी पक्षाच्या खासदारांची मागणी आहे.

JPC म्हणजे संयुक्त संसदीय समिती. संयुक्त संसदीय समिती संसदेची समिती ज्यामध्ये सर्व पक्षांना (विरोधी खासदारांसह) समान सहभाग मिळतो. JPC ची स्थापना करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा कोणत्याही पक्षाला बोलावण्याचा अधिकार JPC ला आहे.

अदानी कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आप खासदार संजय सिंह म्हणाले की, हा अदानी ग्रुप नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोटाळा आहे. कारण मोदीजींनी अदानींना वीज दिली, जहाज दिले, विमानतळ दिले. सर्व काही दिले पण आता जणू अनेक खळबळजनक घोटाळे चव्हाट्यावर आले आहेत. सरकारने याची उच्चस्तरीय चौकशी करावी.

आपल्या देशातील जनतेचा पैसा हडप करता येत नसल्याने हा मुद्दा सभागृहात सर्वात महत्त्वाचा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. हा सार्वजनिक प्रश्न आहे. यावर आम्ही गप्प बसणार नाही. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी अदानी समूहाने देशाची प्रतिष्ठा जगासमोर डागाळल्याचा आरोप केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आमची मागणी आहे.