तीन मुलांची आई असलेल्या महिलेचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तीन मुलांची आई असलेल्या महिलेचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

कल्याण (ठाणे, मुंबई) - 32 वर्षीय महिलेने 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, आरोपी महिलेला तीन मुले आहेत आणि ती त्यांच्या नातेवाईकांची शेजारी आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच तिला अटक करण्यात येईल.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही नाशिकची असून, वारंवार मुंबईत येऊ लागली होती आणि हळूहळू अल्पवयीन मुलाशी मैत्री करत होती. ठाण्यातील कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिलेने अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास भाग पाडले आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीनुसार, मुलगा शाळा सोडून नाशिकमध्ये महिलेला भेटायला जात असे. एवढेच नाही तर आरोपी महिलेने अल्पवयीन मुलाला अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही दाखवले होते.

पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाचे वडील कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी करतात. पीडित मुलाची आई गृहिणी, घरात बहिणी, आजी आहे. पीडित मुलाची आत्या नाशिक येथे कुटुंबासह राहते. तिची तेथे एक मानलेली मुलगी आहे. ती ३२ वर्षांची आहे. तिला दोन मुले आहेत. आईला पाहण्यासाठी नणंद कल्याणला आली की तिच्यासोबत तिची ३२ वर्षांची मानलेली मुलगी कल्याणला पीडित मुलाच्या घरी येत होती. यामधून पीडित मुलगा आणि मानलेली मुलगी यांच्यात ओळख झाली. पीडित मुलगा नाशिक येथे आत्याकडे नियमित जाऊ लागला. तीन महिने राहू लागला. मानलेली मुलगी कल्याणला आली की नणंद, मानलेल्या मुलीची मुले, पीडित मुलगा मुंबई येथे फिरण्यास जात होते. यामधून पीडित मुलगा आणि आरोपी महिला (मानलेली मुलगी) यांच्यात नियमित बोलणे सुरू असायचे. या संवादातून आरोपी महिला आणि पीडित मुलगा यांच्यात शारीरिक संबंध तयार झाले. कल्याणमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा मुलगा नियमित शाळेकडे पाठ फिरवून नाशिकला जाऊन राहू लागला. त्याला विरोध केला की तो रागवायचा. नाशिकला रागातून निघून जायचा. २०१९ पासून हा प्रकार सुरू होता.

आरोपी महिलेने पीडित मुलाला तिच्याशी संभाषण करण्यासाठी, अश्लील चित्रफिती बघण्यासाठी वीस हजार रुपयांचा एक मोबाईल खरेदी करून दिला होता. आईने मुलाला मोबाईलची विचारणा केली तर त्याने नाशिकच्या आरोपी महिलेने घेऊन दिला असे सांगितले. आईचा त्यामुळे संशय बळावला. आईने मुलाच्या खासगी शिकवणीतील शिक्षकाला मुलाला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी पीडित मुलाने आपले नाशिक येथील एका महिलेशी संबंध असल्याचे, आपणास अश्लील चित्रफिती पाहण्याची सवय लागल्याची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखविले. त्यात फरक पडला नाही. मुलगा दारू पिऊ लागला.

मुलाचे मोबाईल काढून घेतले की तो आई, आजीच्या मोबाईलवरून आरोपी महिलेशी संपर्क करत होता. त्याचे मोबाईल काढून घेतले तर तो रागाने नाशिक येथे आरोपी महिलेच्या घरी जात होता. मुलगा व्यसनी बनून फुकट चालला आहे म्हणून कुटुंबीयांना त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात भरती केले. शासनाच्या बालहक्क सुधार विभागाकडून मुलाला समुपदेशन करण्यात येऊ लागले. आरोपी महिलेमुळे आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याला विविध व्यसने लावून फुकट घालविले म्हणून मुलाच्या आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी नाशिकच्या महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.