येरवडा परिसरातील गुंड पिन्या साळवे व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 27 मे - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ पिन्या संजय साळवे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार व गुंडांना महाराष्ट्र झोपडपट्टीदादा व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याच्या कायद्याअंतर्गत (एमपीडीए) तब्बल 81 आणि चालू वर्षात 18 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय 21 रा. यशवंतनगर, येरवडा), टोळी सदस्य आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार ओमकार उर्फ डब्या विनोद जगधने (वय 21 सर्वे नं 103, यशवंत नगर, येरवडा), निखिल उर्फ पप्या संजय साळवे (वय 20 रा. यशवंतनगर, येरवडा) आणि एका विधीसंघर्षीत बालक (वय 16 रा. भोसले वस्ती, येरवडा) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी निलेश साळवे आणि त्याच्या 3 साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मालमत्ते विषयक जाळपोळ, बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव करीत आहेत.