मविआचा केंद्र सरकारविरुद्ध एल्गार; पिंपरीत तीव्र निदर्शने

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मविआचा केंद्र सरकारविरुद्ध एल्गार; पिंपरीत तीव्र निदर्शने

पिंपरी-चिंचवड, दि. 25 - पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राचा अपमान करणा-या मोदी, शहा यांना आगामी काळात जनता घरी बसवेल. केंद्र सरकारच्या विरोधात टीका टिपणी करणाऱ्यांच्या मागे बेकायदेशीरपणे इडी, आयटी आणि सीबीआयचा ससेमिरा लावला जातो. कुटील राजकारण करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात गोऱ्यांच्या विरोधात लढा उभारला होता. आता मोदी, शहा आणि भाजप सारख्या चोरांच्या विरोधात देशभर लढा उभाररून जनतेने त्यांना घरी बसवावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

केंद्रिय तपास यंत्रणांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना मुंबईत अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी, पिंपरी मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सायंकाळी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी केंद्र सरकारचा व भाजपचा निषेध करीत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रिय तपास यंत्रणांच्या विरोधात ‘गांधी लढे थे गोरोंसे, अब लढना है चोरोंसे’ अशा घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

डॉ. कैलास कदम, अजित गव्हाणे, सचिन भोसले, संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, कविता आल्हाट, उर्मिला काळभोर, रविकांत वरपे, नरेंद्र बनसोडे, माधव मुळे, छायाताई देसले आदींनीही केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणारे भाषण केले.