वायसीएममध्ये सुसज्ज फिव्हर क्लिनिक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वायसीएममध्ये सुसज्ज फिव्हर क्लिनिक

पिंपरी, (प्रबाोधन न्यूज) -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रूग्णालयात करोना संशयित आणि कोविड बाधित रुग्णांसाठी सुसज्ज फिव्हर क्लिनिकची व्यवस्था करण्यात आली आहे. ताप, अंगदुखी, खोकला तथा करोना आजाराची इतर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्रथम फिव्हर क्लिनिकमधील डॉक्टरांमार्फत तपासले जात असून क्लिनिक २४ तास सुरू ठेवण्यात आले आहे.

करोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने वायसीएम रुग्णालय कोवीडसमर्पित म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोविड संशयित रुग्णांची तत्काळ अॅटिजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्याची सुविधा वायसीएममध्ये उपलब्ध आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयाची आरटीपीसीआर प्रयोगशाळा व इतर यंत्रणा कार्यरत आहेत. रुग्णालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत संशयित तथा बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन करण्याकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. रुग्णालयात सद्यस्थितीत रुग्णांची गर्दी असून संपूर्ण कर्मचारी, डॉक्टर नर्सेस व इतर स्टाफ रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णालयात कोविड संशयित १०९ आणि कोविड बाधित ५०८  रूग्ण आहेत.

तसेच ऑक्सिजन बेड ३६०, आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरसह ७१ बेड उपलब्ध असून सद्यस्थितीत हे रुग्णालय पूर्णपणे भरलेले आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत २२ हजार ७८१ आंतररुग्णांवर या रुग्णालयामार्फत उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी २१ हजार ७३९ रुग्ण बरे  होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या कोविड बाधित रुग्णांसाठी चोवीस तास स्वतंत्र प्राथमिक तपासणी कक्ष तयार करण्यात आला आहे. कोविड बाधित रुग्णांची तपासणी करून रुग्णांच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली आहे. कोविड बाधित असून लक्षणे सौम्य आहेत अशा रुग्णांना गृहविलगीकरणासाठी समुपदेशन देखील केले जात आहे.

सर्व उपचार मोफत

‘वायसीएम’मध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारी सर्व उपचार प्रणाली मोफत उपलब्ध आहे. गरजू रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रक्तदान, प्लाझ्मादान आणि प्लाझ्मा विलगीकरणाची व्यवस्था रुग्णालयात आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता आपल्या रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करावे. वायसीएममध्ये त्यांच्यावर यशस्वी उपचार केले जातील. तसेच नागरिकांनी करोनाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे.

डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.