आर्यन खानच्या जामीन अटीत शुक्रवारची हजेरी टळली !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आर्यन खानच्या जामीन अटीत शुक्रवारची हजेरी टळली !
मुंबई -
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनाच्या अटीत बदल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता दर शुक्रवारी आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर हजर राहण्याची गरज नाही. आर्यन खानला 3 ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. 

आता दर शुक्रवारी आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर हजर राहण्याची गरज नाही, मात्र आवश्यकता असेल तर आर्यन खानला एसआयटी दिल्लीसमोर हजर राहणे आवश्यक आहे, असं न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी एनसीबीला 72 तासांची पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. तर मुंबईच्या बाहेर प्रवास करण्याच्या अटीच्या संदर्भात न्यायालयाने सांगितले, की आर्यन खानला तपास अधिकाऱ्याला त्यांचा प्रवास कार्यक्रम अगोदर सादर करावा लागेल.

आर्यन खानला 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई हायकोर्टने क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात 13 अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला होता. सध्या आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबी एसआयटी करत आहे. ही टीम दिल्लीत आहे. मुंबई एनसीबी कार्यालयात दर शुक्रवारी हजेरी लावणे योग्य नाही, त्याच बरोबर सुरक्षा यंत्रणेवरही ताण असतो. म्हणून जामीन अटीत बदल करण्याची मागणी मुंबई हायकोर्टात आर्यन खानतर्फे  करण्यात आली होती. याबाबत सुनावणी दरम्यान एनसीबीतर्फेही जामिनाच्या अटीत सुधारण्या करण्यास विरोध करण्यात आला नाही.