ओमिक्रॉन तरुणांसाठी जास्त धोकादायक ठरणार ? जाणून घ्या सत्यता 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ओमिक्रॉन तरुणांसाठी जास्त धोकादायक ठरणार ? जाणून घ्या सत्यता 
नवी दिल्ली -

करोनाच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा जगात खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक देशांमध्ये त्याच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या नवीन प्रकाराच्या बाबतीत, दक्षिण आफ्रिकेचे शास्त्रज्ञ म्हणतात की ओमिक्रॉन किती प्राणघातक आहे आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होईल, हे तूर्तास सांगणे कठीण आहे. ते म्हणाले की करोनाच्या नवीन प्रकाराचा आतापर्यंत बहुतांश तरुणांवर परिणाम झाला आहे. शास्त्रज्ञांनी अशीही चेतावणी दिली आहे की ओमिक्रॉनमुळे फक्त सौम्य आजार होईल की नाही हेसांगणे खूप घाईचे ठरेल. याबाबत अधिक माहिती गोळा करत असून दोन ते तीन आठवड्यांनंतरच याबद्दल अधिक माहिती मिळेल.

तज्ज्ञांच्या मते काही रुग्णांना दाखल करण्यात आले असून ते सर्व तरुण आहेत, ज्यांचे वय 40 किंवा त्यापेक्षा कमी आहे. दुसरीकडे, NICD मधील सार्वजनिक आरोग्य देखरेख आणि प्रतिसाद प्रमुख मिशेल ग्रोम म्हणतात की, करोना विषाणूच्या नवीन प्रकार, ओमिक्रॉनचे बहुतेक बळी तरुण लोक आहेत. परंतु आम्ही वृद्ध वयोगटांमध्येही याची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील नवीन प्रकरणांची संख्या गेल्या 24 तासांत जवळपास दुप्पट होऊन 8,561 झाली आहे. ओमिक्रॉन हे आतापर्यंत देशातील प्रबळ स्ट्रेन आहे.

दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि शास्त्रज्ञांनी 25 नोव्हेंबर रोजी करोनाचे नवीन प्रकार जाहीर केले. यानंतर WHO ने त्याचे नाव ओमिक्रॉन (Omicron) ठेवले. नवीन प्रकार आढळल्यानंतर, यूएस, युरोपियन युनियन, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांनी अनेक दक्षिण आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली. त्याचवेळी काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.