'गोविंदा आला रे आला'च्या जल्लोषात अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत दहीहंडी साजरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'गोविंदा आला रे आला'च्या जल्लोषात अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत दहीहंडी साजरी
पिंपरी,(प्रबोधन न्यूज ) -रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लाॅवर इग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद लुटला. गोविंदा आला रे आला…  यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते. 
         संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
          कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व कृष्ण पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी कृष्णभजन व पाळणा गीत' सादर केले. बालचमूंनी राधा - कृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा बनवत 'मच गया शोर सारी नगरी रे' या गीतावर ठेका धरत वातावरणात रंगत आणली. शिक्षकही यामध्ये सहभागी झाले होते. दहीहंडी फोडताना कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बालगोपालांनी एकच जल्लोष करीत दहीहंडी फोडली. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला यांचे महत्त्व सांगितले. 
          संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांना 'प्रगतीची उंच दहीहंडी उभारू, देऊ एकमेकांना साथ' असे आवाहन केले. विद्यार्थ्याना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव आयोजित केला होता, असेही सांगितले. संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी दहीहंडी साजरी करण्यामागील उद्देश सांगून बालगोपाळाचे गुण आत्मसात करा, असे सांगितले.