राष्ट्रप्रेमाचा नारा देत तिरंगा बाईक रॅलीला उस्त्फूर्त प्रतिसाद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रप्रेमाचा नारा देत तिरंगा बाईक रॅलीला उस्त्फूर्त प्रतिसाद
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार
- पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात
पिंपरी। प्रतिनिधी -
    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   भारत माता की जय... वंदे मातरम्‌च्या घोषणा... दुचाकी वाहनांना डौलाने फडकणारा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि रस्त्यावरून शिस्तबद्ध जाणारी दुचाकीची रांग... राष्ट्रप्रेमाने भारावलेले हे चित्र आहे भाजपाच्या वतीने काढलेल्या ‘तिरंगा बाईक रॅली’मधील. या रॅलीला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचा समारोप आणि ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने चिंचवड किवळे मंडल आणि प्राधिकरण चिंचवड मंडलाच्या  वतीने तिरंगा बाईक रॅली आयोजित केली होती. 
यावेळी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपल्या देशाप्रती आपला अभिमान व्यक्त केला. तसेच, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्याग केला त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाचा होम करुन पेटवलेल्या धगधगत्या क्रांतीपर्वातून साकारलेल्या या स्वातंत्र्यपर्वाचा आपण आदर केला पाहिजे. देशाच्या विकासात आपणही योगदान दिले पाहिजे. या उद्देशाने या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी आमदार अश्विनी जगताप, विधानपरिषद आमदार उमा खापरे,  माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडगिरी, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, अभिषेक बारणे,  राजेद्र गावडे, सुरेश भोईर, आरती चोंधे, मनिषा पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव अजित कुलथे, चिंचवड किवळे मंडलध्यक्ष योगेश चिंचवडे, युवा मोर्चा शहरध्यक्ष संकेत चोंधे, माजी स्विकृत प्रभाग सदस्य बिभिषण चौधरी, युवा मोर्चा मंडलध्यक्ष सन्नी बारणे,  जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस प्रसाद कस्पटे, शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, चिंचवड किवळे मंडलउपाध्यक्ष नूतन चव्हाण आदी उपस्थित होते.  
**** 
…या मार्गावर निघाली रॅली
सकाळी 9 वाजता श्रीधर नगर ऑफिस- गार्डन सर्कल - स्वामी विवेकानंद चौक - जीवन नगर अहिंसा चौक - S.K.F. कॉलनी - उद्योग नगर दत्त मंदिर मार्गे - मंगल उपवन- गणेश नगर - श्रद्धा गार्डन भोईर कॉलोनी - दिवाकर चौक- राम मंदिर मार्गे - पारिजात - स्वामी विवेकानंद रोड मार्गे - लाईफ स्टाईल सोसायटी - मोरया हॉस्पिटल - स्वातंत्र्यवीर चापेकरबंधू चौक मार्गावर पार पडली. तसेच, सकाळी 10 वाजता बापुजीबुवा मंदिर थेरगाव, डांगे चौक, सम्राट चौक वाकड रोड, वेणुनगर, पिंक सिटी रोड, म्हातोबा चौक, छत्रपती चौक, मानकर चौक, कस्पटे चौक, डीपी रोड विशालनगर, पिंपळे निलख बस स्टॉप या मार्गावर आयोजित करण्यात आली.
         "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. शहरातील नागरिकांमध्ये देश प्रेमी भावना वाढीस लागावी, यासाठी हा उपक्रम तळागाळात घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बाईक रॅली आयोजित करून ही मोहीम अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल नागरिकांचे, भाजपा पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो." 
                      - शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी चिंचवड.